उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी १९ जुलै रोजी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली आहे. या प्रकरणात नावांचे बरेच घोळ झाल्याचे समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी कलाकार उमेश कामत नामसाधर्म्य असल्याने यात अडकल्याची बातमी समोर आली होती. बऱ्याच माध्यमांनी उमेश कामत म्हणून अभिनेता उमेश कामतचा फोटो देखील दाखवला होता. काही शाहनिशा न केल्याने उमेशला विनाकारण मन:स्तापाला सामोरे जावे लागलं होतं. उमेशने आपली नाराजी लोकसत्ता डॉट कॉमकडे व्यक्त करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा विचार असल्याचे सांगितले होते. उमेश कामत नंतर अजून एका कलाकाराबरोबर असंच काही झाल्याची बाब समोर आली आहे.

या वेळेस सारख आडनावं असल्याने हिंदीतील लोकप्रय अभिनेता करण कुंद्राला टिकेचा सामना करावा लागला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने या घटनेमुळे होणाऱ्या परिणामाबद्दल बोललं आहे. तो म्हणाला की “मी सकाळी उठल्यावर मोबाईल चेक केला तेव्हा ट्विटरवर माझा फोटो होता, लोकं मला टॅग करत होते. मला सगळं प्रकरण समजून घ्याल वेळ लागला. काही लोकांना खरंच वाटलं की तो कुंद्रा मी आहे आणि मला शिव्या शाप द्याल सुरवात केली.”

करण पुढे म्हणाला “या अगोदर देखील असंच झालं होतं कोणी तरी मला राज कुंद्रा समजलं होतं, तेव्हा मी सोडून दिलं होतं. मात्र आता माझ्याकडे त्या बतमीचे स्क्रीनशॉटस् आहेत, ज्या माध्यमांनी राज कुंद्रा समजून माझ नावं घेतलं आहे. आता ही बातमी कोणत्या गावातल्या व्यक्तीने वाचली तर काय होइल…………..तो व्यक्ती पुढचे उपडेट वाचणार नाही आणि मग आयुष्यभर लोकं मलाच दोषी समजतील.”

दरम्यान राज कुंद्रा प्रकरणात एक वेगळ वळण आले आहे. वेबसाईटऐवजी कुंद्रांच्या कंपनीने अ‍ॅपचा पर्याय निवडण्यामागेही एक कारण असल्याचं समोर आलं आहे. वेबसाईटच्या तुलनेत अ‍ॅप हे वापरण्यास अधिक सोयीस्कर ठरेल या विचारातून वेबसाईटऐवजी अ‍ॅप सुरु करुन त्या माध्यमातून या चित्रपटांचं वितरण करण्यात आलं. तसेच वेबसाईटवर कारवाई झाल्यावर तिच्यावर बंदी येऊ शकते मात्र अ‍ॅप पूर्णपणे बंद करता येत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मॉडेल्स आणि अभिनेत्री केवळ अशाप्रकारच्या चित्रपटांमध्येच काम करतात आणि कुंद्रा यांचा वापर करुन या चित्रपटांची निर्मिती करायचा अशी माहिती समोर आली आहे.