सैफ अली खानसह लग्न झाल्यापासून करिना कपूरने फार मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. काही चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली तर काहींमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका तिने साकारली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली तर सैफच्या ‘हॅप्पी एन्डिंग’मध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली.
सध्या ती आगामी ‘बजरंग भाईजान’ या सलमानसोबतच्या चित्रपटात व्यस्त आहे. मात्र, यातूनही करिनाने तिचा खास मित्र करण जोहरसाठी वेळ काढला. करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘ब्रदर्स’ या आगामी चित्रपटातील आयटम साँगचे करीना कपूरने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत शूटींग पूर्ण केले. हॉलिवूडच्या ‘वॉरियर’ या चित्रपटाचा ‘ब्रदर्स’ हा रिमेक आहे. यात अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडीस यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only for bff karan johar kareena kapoor to do an item song with sidharth malhotra in brothers