Adult Horror Movies On OTT: आजकाल प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची क्रेझ खूप वाढली आहे. अलीकडे निर्मातेही या शैलीचे चित्रपट बनवताना दिसत आहेत. तुम्ही अॅडल्ट हॉरर चित्रपट पाहिले आहेत का? जर पाहिले नसतील, तर आम्ही तुम्हाला अशा ५ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या कुटुंबासह पाहू शकणार नाही आणि ते एकटे पाहण्याची हिंमतही होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर हे चित्रपट पाहू शकता. या चित्रपटांमध्ये तुम्हाला भीतीबरोबरच भरपूर रोमान्सही पाहायला मिळेल.
स्पेशियस
Species on Prime Video: ३० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्पेशियस’ हा एक ब्लॉकबस्टर सायन्स-फिक्शन थ्रिलर आणि हॉरर चित्रपट आहे. या हॉरर चित्रपटात नताशा हेन्स्ट्रिजने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला IMDb वर ५.९ रेटिंग मिळाले असले तरी, तुम्ही तो एकटे पाहू शकणार नाही. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
फ्रायडे द 13th
Friday The 13th on Prime Video: ‘फ्रायडे द 13th’ हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात जेरेड पॅडालेकी, डॅनिएल पानाबेकर, आरोन यू, अमांडा रिगेटी, ट्रॅव्हिस व्हॅन विंकल आणि डेरेक मियर्स यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात काही मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे जे क्रिस्टल लेक येथील जंगलात कॅम्पिंग करतात, पण तिथे त्यांची भेट अशा व्यक्तीशी भेट होते, जो सर्वांना मारू इच्छितो. हा चित्रपट तुम्ही एकटे पाहू शकत नाही. या सिनेमाला IMDb वर ५.५ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
ब्लडी मर्डर 2: क्लोजिंग कॅम्प
Bloody Murder 2: Closing Camp on Prime Video: हा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला एक क्राइम हॉरर सिनेमा आहे. यात केटी वुड्रफ, केली गनिंग आणि अमांडा मॅगारियन यांच्यासह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा सीरियल किलर ट्रेव्हर मूरहाऊसच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर देखील पाहता येईल.
Maniac
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला Maniac हा चित्रपट एका सिरीयल किलरभोवती फिरतो. या सिनेमाला आयएमडीबीवर ६.१ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटात भयंकर दृश्ये दाखवण्यात आली आहेत. हा चित्रपट तुम्हाला युट्यूबवर पाहता येईल.
प्लॅनेट टेरर
Planet Terror on Prime Video : ‘प्लॅनेट टेरर’ मध्ये प्रेक्षकांना एका झॉम्बी हल्ल्याची कथा पाहायला मिळते. यात झॉम्बी एक डान्सर आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर हल्ला करतो. हा चित्रपट भयानक आहे. तसेच यात बरेच इंटिमेट सीन्स आहेत, त्यामुळे हा चित्रपट तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही. ‘प्लॅनेट टेरर’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. याला IMDb वर ७ रेटिंग मिळाले आहे.