ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढल्यानंतर निर्माते काही चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यासाठीच तयार करतात. तसेच काही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात अडचणी आल्यास ते ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. अशाच एका बोल्ड चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे.

ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनर्सचे सिनेमे उपलब्ध असतात. तसेच जगभरातील सिनेमांबरोबरच सीरिज व टीव्ही शोही पाहता येतात. सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालणारा असाच एक बोल्ड चित्रपट एवोल (EVOL) आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता.

‘एवोल’मधील बोल्ड कंटेंटमुळे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ दिला नाही. काही सीन्स खूप बोल्ड असल्याने सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली. त्यामुळे हा चित्रपट आता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट तेलुगू ओटीटी प्लॅटफॉर्म Aha वर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ओटीटीवरील सर्वात बोल्ड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला ओटीटीवर जबरदस्त व्ह्यूज मिळाले आहेत. पण हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहण्यासारखा नाही.

तेलुगू चित्रपट एवोल सध्या बोल्ड कंटेंटमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. या मुलीचे एकाच वेळी दोन मित्रांबरोबर अफेअर असते. या चित्रपटात बोल्ड दृश्यांचा भडीमार आहे. थिएटर्समध्ये बंदी घालण्यात आलेला हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.

‘एवोल’ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये असा जबरदस्त खुलासा होतो, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. हा चित्रपट तुम्हाला कुटुंबाबरोबर अजिबात पाहता येणार नाही. या चित्रपटाची निर्मिती नक्षत्र फिल्म्स लॅब्सने केली आहे. या चित्रपटाची कथा, संवाद, दिग्दर्शन सगळं योगी वेगालापुडी यांचं आहे. या चित्रपटाला संगीत सनील कश्यप यांनी दिलं आहे.