‘बिग बॉस ओटीटी २’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो दिवसेंदिवस मजेदार होत आहे. मागच्या आठवड्यात शोमध्ये एविक्शन झालं नाही आणि शो दोन आठवड्यापर्यंत वाढविल्याची माहिती समोर आली होती. पण, आता एका सदस्याने हा शो सोडला असल्याचं वृत्त आलं आहे. कौटुंबीक इमरजेन्सीमुळे या सदस्याला शो सोडावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सुख माणसाला मुकं बनवतं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अचानक बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेणाऱ्या सदस्याचं नाव आहे सायरस ब्रोचा. नुकत्याच झालेल्या वीकेंड का वारमध्ये सायरसने सलमान खानकडे शो सोडण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. तो झोपू शकत नाही आणि अन्नाशिवाय जगू शकत नाही, तसेच त्याचा मधुमेह असल्याने त्यासंबंधित इतर समस्याही असल्याचं सांगितलं होतं. पण, सलमानने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की त्याने करारावर सही केली आहे, त्यामुळे तो शो सोडू शकत नाही. त्याला शो सोडायचा असेल तर मोठा दंड भरावा लागेल.

जेव्हा समोरासमोर आल्या जया बच्चन अन् रेखा; अवॉर्ड शोमध्ये पुढे काय घडलं होतं, तुम्हीच पाहा Video

बिग बॉस ओटीटी सीझन २ च्या ताज्या एपिसोडमध्ये सायरस शो सोडताना दिसला. एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं की बिग बॉस सायरसला कन्फेशन रूममध्ये बोलावतात आणि कुटुंबातील इमरजेन्सीबद्दल सांगतात. त्याला याचा धक्का बसला आणि तो शोमधून बाहेर पडला. यानंतर, बिग बॉसने सर्व घरातील सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र येण्यास सांगितले. माणुसकीच्या आधारावर बिग बॉसने सायरसला घरातून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे, असं ते इतर सदस्यांना म्हणाले.

‘ओह माय गॉड २’मधील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांचा अक्षय कुमारला इशारा; म्हणाले, “हिंदू देवांचा…”

चॅनेलने सायरसच्या घरातून बाहेर पडण्याबाबत एक स्टेटमेंट प्रसिद्ध केले आहे. “अचानक कौटुंबिक इमरजेन्सीमुळे सायरस ब्रोचा यांना बिग बॉस ओटीटी २ मधून एक्झिट घ्यावी लागली. सायरस आणि त्याच्या कुटुंबाच्या विनंतीनुसार त्यांची प्रायव्हसी जपण्याचं आवाहन आम्ही करतो,” असं चॅनलने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyrus broacha left bigg boss ott 2 due to family emergency hrc