बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल आणि तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर  २० फेब्रुवारीला लग्नबंधनात अ़डकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नाच्या दिवशी दिव्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येत होती असे तिने कबूल केले.

दिव्या आणि अपूर्वच्या लग्नानंतर दोघांनी मीडियाबरोबर गप्पा मारल्या आणि त्यांना मिठाई दिली. लग्नादरम्यान दिव्या खूप खूश होती, तसेच भावुकही झाली होती.

पापाराझींनी दिव्याला लग्नाच्या वेळेस ती भावुक का झाली होती असं विचारल्यावर दिव्या म्हणाली, तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येत होती.

हेही वाचा… “माझे अपहरण तुमच्या भक्तांनी…”, पाच वर्षांनी विक्रांत मेस्सीने ‘त्या’ पोस्टबद्दल मागितली माफी; म्हणाला, “हिंदू समुदायाला…”

दिव्याच्या पतीने लग्नाच्या दिवशी चष्मा लावला होता. याबाबत दिव्या म्हणाली, “अपूर्व पूर्ण दिवस हा चष्मा घालणार आहे.” यावर हसत अपूर्व म्हणाला, “हा चष्मा तिच्या वडिलांचा आहे.” सोशल मीडियावर सगळे जण नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आपल्या लग्नाचे काही सुंदर फोटो या कपलने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एका फोटोत अपूर्व दिव्याला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. दोघेही आपल्या लग्नाच्या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत दोघेही सप्तपदी घेताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत दोघे रोमॅंटिक पोज देत एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत दिव्याने लिहिले, “या क्षणापासून, आमची प्रेमकथा सुरू झाली आहे… रब राखा.”

हेही वाचा… सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाचं पोस्टर अनोख्या पद्धतीने केलं लाँच; पाहा खास Video

दरम्यान, दिव्या आणि अपूर्वबद्दल सांगायचं झालं तर दोघांनी २०२२ मध्ये साखरपुडा केला होता. दोघांचा साखरपुडा फिल्मी झाला होता. अपूर्वने दिव्याच्या वाढदिवसाला तिला लग्नाची मागणी घातली होती आणि मराठी स्टाईलमध्ये विचारलं होतं की, “माझी बायको बनशील का?”