या आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, एमएक्स प्लेयर व जिओ हॉटस्टारवर या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या कलाकृती तुम्ही पाहू शकता. यापैकी काही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले होते, पण त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. आता त्यांना ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
किंगडम
ही कथा कॉन्स्टेबल सूर्याची आहे, जो श्रीलंकेच्या एका बेटावर गुप्त मोहिमेवर जातो. तिथे तो त्याचा हरवलेला भाऊ शिवाला पुन्हा भेटतो. नंतर त्यांचा सामना सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीशी होतो. विजय देवरकोंडाच्या किंगडम चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता, पण नेटफ्लिक्सवर त्याला प्रेक्षकांची पसंती मिळते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हाफ सीए सीझन 2
हाफ सीए सीझन 2 मध्ये एहसास चन्ना, ज्ञानेंद्र त्रिपाठी व अनमोल काजानी हे कलाकार आहेत. ही सीरिज २७ ऑगस्टला एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली. तुम्ही ती विकेंडला पाहू शकता.
The Chronicles of the 4.5 Gang
या वेब सीरिजमध्ये तिरुवनंतपुरममधील एका झोपडपट्टीतील पाच मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. मंदिरातील उत्सवावरून एका गुंडाशी या सर्वांचा संघर्ष होतो ते या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज आज २९ ऑगस्टला रिलीज झाली आहे. तुम्ही ती सोनी लिव्हवर पाहू शकता.
साँग्स ऑफ पॅराडाईज
‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद महान काश्मिरी गायिका राज बेगमच्या भूमिकेत आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदान देखील या चित्रपटात आहे.
मेट्रो इन दिनों
सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि फातिमा सना शेख यांचा ‘मेट्रो… इन दिनों’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
रँबो इन लव्ह
हा सिनेमा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका उद्योजकावर बेतलेला आहे. त्याला व्यवसाय वाचवण्यासाठी तातडीने पैशांची आवश्यकता असते. त्याच्या व्यवसायात एक्स गर्लफ्रेंड गुंतवणूक करते आणि मग या कथेत ट्विस्ट येतो. जिओ हॉटस्टारवर हा चित्रपट पाहता येईल.
सर्कीट
‘सर्कीट’ हा चित्रपट युएईमधील एका मल्याळी जोडप्यावर बेतलेला चित्रपट आहे. यात आसिफ अली, दिव्या प्रभा, दिपक पारांबल हे कलाकार आहे. हा चित्रपट मनोरमा मॅक्सवर पाहता येईल.