अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुचर्चित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. नुकतंच मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ताली’ या वेबसीरिजमध्ये हेमांगी कवीने सायली हे पात्र साकारलं आहे. यात ती गौरी सावंत यांच्या बहिणीचे पात्र साकारताना दिसत आहे. रवी जाधव यांनी नुकतंच तिच्या पात्राची एक झलक दाखवली आहे. त्याला त्यांनी खास कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…” 

हेमांगी कवीची पोस्ट

“हेमांगी कवी आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थीनी. तिने अभिनय केलेल्या ‘धुडगूस’ या सुंदर चित्रपटाची जाहिरात मी केली होती परंतु एकत्र काम पहिल्यांदाच ‘ताली’ मध्ये केले. छोटेशी व्यक्तीरेखा असुनही तीने ती ज्या ताकदीने साकारली आहे की जी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील!!!”, असे रवी जाधव यांनी म्हटले आहे.

रवी जाधव यांच्या या पोस्टवर हेमांगी कवीनेही प्रतिक्रिया दिली आहे. “खूप खूप धन्यवाद, सिनीअर” असे हेमांगी कवीने कमेंट करत म्हटले आहे.

आणखी वाचा : “मला नवरा हवाय, पण माझ्या दोन्हीही मुलींना…”, वयाची ४५ शी ओलांडलेल्या सुश्मिता सेनने केला लग्नाबद्दल खुलासा, म्हणाली “माझे वडील…”

दरम्यान ‘ताली’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director ravi jadhav special post for hemangi kavi sushmita sen taali web series nrp