Mrunal Thakur Watched 3 Marathi Films: मराठमोळी मृणाल ठाकूर बरेचदा तिचं मराठीप्रेम व्यक्त करत असते. कधी ती मराठी मालिका बघतानाचा आईबरोबरचा व्हिडीओ शेअर करते, तर कधी तिची अहिराणी बोली प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. आता मृणालने एकाच दिवसांत ३ मराठी चित्रपट पाहिलेत, असं सांगितलं.

मृणाल ठाकूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिने एकाच दिवशी ४ चित्रपट पाहिले, असं सांगितलं. या चारपैकी ३ चित्रपट मराठी होते. तिने या सर्व चित्रपटांची नावं चाहत्यांना सांगितली. इतकंच नाही तर चांगले चित्रपट सुचवा, असंही तिने चाहत्यांना म्हटलं.

मृणाल ठाकूरने पाहिलेला बॉलीवूड चित्रपट कोणता?

मृणाल ठाकूरने एक एव्हरग्रीन मराठी चित्रपट पाहिला. तर एक अलीकडचाच आलेला मराठी चित्रपट पाहिला. मृणालने पाहिलेल्या चारपैकी एक चित्रपट हर्षवर्धन राणेचा आहे. मृणाल ठाकूरने सनम तेरी कसम हा ९ वर्षांपूर्वी रिलीज झालेला चित्रपट पाहिला.

मृणाल ठाकूरने पाहिले तीन मराठी चित्रपट

मृणालने पाहिलेल्या मराठी चित्रपटांची नावं सांगितली. मृणाल ठाकूरने अलीकडेच आलेला स्थळ सिनेमा पाहिला. त्याचबरोबर गोदावरी आणि अशी ही बनवाबनवी हे चित्रपटही पाहिले. त्याचबरोबर आणखी चांगेल चित्रपट सुचवा असं ती व्हिडीओत म्हणाली.

‘स्थळ’

‘स्थळ’ हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी झी5 वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केलं आहे. सचिन पिळगावकर प्रस्तुत सिनेमात नंदिनी चिकटे मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर संगीता सोनेकर, संदीप सोमलकर, सुयोग धवस, संदीप पारखी हे कलाकार आहेत.

गोदावरी

गोदावरी चित्रपटात नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, सखी गोखले, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने हे कलाकार आहेत. हा चित्रपट जिओ हॉटस्टावर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

अशी ही बनवाबनवी

मृणाल ठाकूरने १९८८ साली आलेला एव्हरग्रीन ‘अशी ही बनवाबनवी’ पाहिला. ‘अशी ही बनवाबनवी’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, अश्विनी भावेसह अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी या सिनेमात आहे.