संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १ मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजच्या सध्या जोरदार चर्चा आहे. भारतात ही सीरिज ट्रेंड करत आहे. प्रेक्षकांचाही सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही ही पाहिली असेल किंवा पाहण्याचा विचार करत असाल तर त्याबरोबर नेटफ्लिक्सवर ट्रेंड होणाऱ्या इतर कलाकृतीही पाहू शकता.

नेटफ्लिक्सवर २०२४ मध्ये अनेक चित्रपट व सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. यापैकी काही कलाकृती सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहेत. तुम्ही जर वीकेंडला ओटीटीवर चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा विचार करत असाल तर या कलाकृती पाहू शकता. पाहूयात नेटफ्लिक्सवरील या ट्रेंडिंग कलाकृतींची यादी.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

हीरामंडी: द डायमंड बाजार

‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ ही पीरियड ड्रामा सीरिज आहे. ही मालिका ब्रिटीश राजवटीत लाहोरच्या हीरामंडी या रेड-लाइट एरियातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवनावर आधारित आहे. संजय लीला भन्साळी यांची ही सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली असून ती खूप चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ही सीरिज १ नंबरवर ट्रेंड करत आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शो

तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनोदी कंटेंट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी कपिल शर्माचा हा शो चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही हा शो पाहून मनसोक्त हसू शकता. या शोमध्ये तुम्हाला रणबीर कपूर- नीतू कपूर, रोहित शर्मा, आमिर खान, विकी कौशल व सनी कौशल यांचे एपिसोड पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचे एपिसोड पाहू शकता. प्रत्येक वीकेंडला या शोचा एक नवीन भाग नेटफ्लिक्सवर रिलीज होतो.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

डेड बॉय डिटेक्टिव्ह

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ही सीरिज तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. मिस्ट्री आणि थ्रिलर असलेली ही सीरिज तुमचं चांगलं मनोरंजन करेल. या सीरिजचे एकूण आठ एपिसोड आहेत. तुम्हाला मिस्ट्री व थ्रिलर कंटेंट आवडत असेल तर तुम्ही ‘डेड बॉय डिटेक्टिव्ह’ ही सीरिज पाहू शकता.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

बेबी रेनडिअर

‘बेबी रेनडिअर’ ही ब्लॅक कॉमेडी, ड्रामा आणि थ्रिलरवर आधारित सीरिज आहे. ही सात भागांची मालिका नेटफ्लिक्सवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

क्वीन ऑफ टियर्स

‘क्वीन ऑफ टियर्स’ ही कोरियन सीरिज आहे. अडचणीत सापडलेल्या एका विवाहित जोडप्याची गोष्ट या मालिकेत सांगण्यात आली आहे. १६ भागांच्या या सीरिजमध्ये कॉमेडी व रोमान्सचा तडका आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

या नेटफ्लिक्सवर या आठवड्यात ट्रेंड करणाऱ्या टॉप पाच वेब सीरिज आहेत. तुमचा वीकेंडचा काही प्लॅन नसेल तर या सीरिज तुमचं मनोरंजन करू शकतात.