‘स्ट्रेंजर थिंग्स’ फेम अभिनेता नोआ श्नॅप सध्या चर्चेत आहे. नोआ श्नॅपने तो समलिंगी असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर करत नोआ स्नॅपने ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोआ श्नॅपने त्याच्या टिक टॉक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो “तुम्हाला हे आधीच माहीत होतं” असं लिप्सिंग करत आहे. नोआ श्नॅपने तो गे असल्याची माहिती त्याचे कुटुंबीय व मित्रमैत्रिणींना दिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. “१८ वर्षांनंतर मी समलैंगिक (गे) असल्याबाबत माझे कुटुंबीय व मित्र परिवाराला सांगितलं. आणि ते म्हणाले, आम्हाला हे आधीपासूनच माहीत होतं”, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>लग्नाच्या २३ वर्षांनंतर थलपथी विजयचा संसार मोडणार? पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा

हेही वाचा>> ‘तु तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही नेटफ्लिकवरील लोकप्रिय सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये नोआ श्नॅपने विल बायर्स ही भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्येही तो समलैंगिक असल्याचं दाखविण्यात आलं आहे. सीरिजमध्ये तो बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडल्याचं दाखविण्यात आलं आहे. नोआ श्नॅप सीरिजमधील भूमिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही गे असल्याचं समोर आलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stranger things netflix fame actor noah schnapp said he is a gay kak