बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याचा ‘बॉस’ हा महत्त्वकांक्षी चित्रपट न्यायालयाच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. अक्षयच्या ‘बॉस’मध्ये होनी सिंगने गायलेल्या ‘पार्टी ऑल नाईट’ गाण्यामध्ये ‘शिवराळ’ भाष वापरली असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने करत प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती एन.व्ही रामन व न्यायमूर्ती मनमोहन यांच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ‘बॉस’वर सुनावणी होणार आहे. चित्रपटा्च्या निर्मात्यांनी ‘अक्षेपार्ह’ शब्द वगळण्यात आले आहेत का अशी विचारणा खंडपीठाच्या पुढील सुणावणीमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असनारा बॉस चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.