बिग बॉसची माजी स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्राने अभिनेत्री सनी लिऑनी विरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. तसेच तिच्याकडून नुकसान भरपाई म्हणून पूजाने १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
बिग बॉस पाचव्या पर्वामध्ये पूजा मिश्रा सहभागी झाली होती. त्याच पर्वात सनीला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. माझ्या लोकप्रियतेमुळे सनीच्या मनात माझ्याविषयी द्वेष आणि मत्सर होता. याचमुळे तिने काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलखतीतून माझी बदनामी केली. त्यामुळे माझे ७० लाखांचे नुकसानही झाले, असा आरोप पूजाने केला आहे.
आयपीसीच्या ५०० (बदनामी) आणि १२० बी (कट रचणे) या कलमातंर्गत सनी विरोधात कारवाई सुरु करावी अशी पूजाने मागणी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
सनी लिऑनी विरोधात १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा खटला
माझ्या लोकप्रियतेमुळे सनीच्या मनात माझ्याविषयी द्वेष आणि मत्सर होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 05-04-2016 at 10:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja misrra slaps rs 100 cr defamation case against sunny leone