‘व्हायकॉम १८’ निर्मिती संस्थेचा आगामी चित्रपट ‘वॉट द फिश’च्या प्रमोशनकरिता मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडेला आमंत्रित करण्यात आले आहे. चित्रपटाला जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळावी याकरिता पूनमला आमंत्रित केले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण, पूनम या चित्रपटाचे प्रमोशन करणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबरला वायकॉम १८ हे चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. त्यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत पूनमही प्रसिद्धी करताना दिसू शकते. पूनम लवकरच वायकॉम १८सोबत चित्रपट करणार आहे. त्यामुळे ‘वॉट द फिश’च्या प्रसिद्धीला पूनम तिचा सहभाग दर्शविण्याची शक्यता आहे. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता त्या चित्रपटाच्या कलाकारांव्यतिरीक्त दुस-या सेलिब्रिटीला बोलावले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam pandey to promote dimple kapadias what the fish