प्रिया बापट नेहमीच आपल्याला विविध भूमिकांमध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटा व्यतिरिक्त प्रियाला अनेक गोष्टींची आवड आहे. तिला व्यायाम आणि सायकलींग करायला फार आवडते. नुकतीच प्रिया अभिनेता मिलिंद सोमण याच्या सोबत १० किलोमीटरच्या मॅरॅथॉनमध्ये धावली होती. तिच्यासाठी आयन मॅन मिलिंदसोबत धावण्याचा अनुभव नक्कीच वेगळा असले. सोशल मीडियावर प्रिया आणि मिलिंदचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रिया उमेश कामत प्रमाणेच तिच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरुक असते. जिममध्ये जाऊन आल्याशिवाय तिचा दिवस सुरु होत नाही. त्यामुळे दररोज सकाळी प्रिया न चुकता जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते. मिलिंदसोबत धावण्यासाठी प्रियाने नक्कीच जबरदस्त तयारी केली असणार हे काही वेळ सांगायला नको.

प्रिया ‘वजनदार’ या चित्रपटात जरी गोलु मोलु दिसत असली तरी आता ती एकदमच फिट झाली आहे. कलाकारांना भूमिकेच्या गरजेप्रमाणे
मेहनत घ्यावी लागते. एखाद्या व्यक्तिरेखेसाठी वजन वाढवावे लागते. तर कधी अगदी साईज झिरो देखील व्हावे लागते. आता प्रियाचेच पाहा ना तिने ‘वजनदार’ या चित्रपटासाठी वजन वाढवले होते. मात्र आता मॅरेथॉनमध्ये धावतानाच्या फोटोमध्ये मात्र ती एकदम तंदुरुस्त दिसत आहे. त्यामुळे नेहमीच कलाकारांना रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये समतोल साधताना कसरत करावी लागते. प्रिया आता जरी फिट दिसत असली तरी तिला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असेल आणि घाम गाळावा लागला असेल यात काही शंका नाही. तिच्या या मेहनतीमुळेच ती मिलिंदसोबत मॅरॅथॉनमध्ये १० किलोमीटरचे अंतर पळून पार करु शकली.