बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अलिकडेच पॉप प्रकारातील गाणी गाण्यासाठी प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेतील लास वेगासमध्ये पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सला भेटली. प्रियांका चोप्रा वेगासमधील सरन्डर नाईट क्लबमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्यासाठी गेली होती. टि्वटरवर पोस्ट केलेल्या छायाचित्रात दोन्ही सेलिब्रिटीज् कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहेत. यावेळी प्रियांकाने पिवळ्यारंगाचा तर ब्रिटनीने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. ‘आय कान्ट मेक यू लव्ह मी’ हे प्रियांकाने गायलेले गाणे मागील आठवड्यात भारतात आणि अमेरिकेत प्रसिद्ध करण्यात आले.
  संग्रहित लेख, दिनांक 6th May 2014 रोजी प्रकाशित  
 वेगासमध्ये प्रियांका चोप्रा आणि ब्रिटनी स्पिअर्सची भेट
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अलिकडेच पॉप प्रकारातील गाणी गाण्यासाठी प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेतील लास वेगासमध्ये पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सला भेटली.

  First published on:  06-05-2014 at 04:47 IST  
TOPICSप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra meets britney spears in vegas