प्रियांका चोप्रा एक अशी अभिनेत्री आहे जिच्या प्रियकराबद्दल तसेच पूर्वाश्रमीच्या प्रियकराबद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. नुकीतच ती अमेरिकेतील ‘डर्टी लॉड्री’ या चॅट शोमध्ये गेली होती. या चॅट शोमध्ये तिने आपल्या एअरपोर्ट जॅकेटबद्दल एक किस्सा सांगितला. प्रियांका म्हणाली की, जेव्हा तो माझ्या घरी आला होता तेव्हा तो जॅकेट माझ्याच घरी विसरुन गेला. त्याने हे जॅकेट मागितलेही होते. पण मीच हे जॅकेट परत केले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा प्रियांका चोप्राचे नाव बॉलिवूडचा किंग शाहरुख खानशी जोडले गेले होते तेव्हा सोशल मीडियावर या चर्चांना भलतेच उधाण आले होते. या दोघांनी एकदा एकसारखेच जॅकेट घातले होते. त्या दिवसापासून दोघांच्या नात्याबद्दल बोलले गेले होते. ‘फेमिना’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत ज्या व्यक्तिचे जॅकेट आहे त्याच्याबद्दल उल्लेख केला होता. कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता ती म्हणाली की, ‘मी त्याला एमएफ नावाने हाक मारते.’

‘फेमिना’साठी केलेल्या फोटोशूटमधील काही फोटो प्रियांकाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियांकाच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. प्रियांका गेल्या काही दिवसांपासून न्युयॉर्क शहरात आहे. ‘क्वांटिको’ या टीव्ही सिरीअलच्या तिसऱ्या सीझनमध्येही ती दिसणार आहे. प्रियांकाने ‘क्वांटिको’च्या सीझन १ आणि २ मध्ये एजेंट एलेक्स पेरिशची व्यक्तिरेखा साकारली होती. आता या तिसऱ्या सिझनमध्येही तिला प्रेक्षकांचे प्रेम मिळणार की नाही हे लवकर कळेलच. प्रियांकाने ‘बेवॉच’ या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra reveals the name of his ex boyfriend whose jacket she wear at airport