आपल्या अभिनयाने केवळ बॉलीवूड नाही तर हॉलीवूडलाही वेड लावणारी बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा क्वांटिको सिरीजने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. क्वांटिकोच्या पहिल्या सिजननंतर आता ती क्वांटिको २ मध्ये ही दिसते आहे. हॉलिवूडच्या मालिकेतील अभिनयाच्या जोरावर प्रियांकाने हॉलिवूड चित्रपटात देखील वर्णी लावली आहे. मात्र प्रियांकाला कोणती मालिका आवडते हे कळल्यास तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. हॉलिवूडमध्ये स्टंटबाजीच्या करणाऱ्या प्रियाकांने नुकतेच एका दैनिकाला मुलाखत दिली. यावेळी तिला तुला कोणत्या मालिकेत काम करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रियांकाने दिलेले उत्तर थक्क करणारे असे होते.
जितेंद्र कन्या एकता कपूरच्या ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ मालिकचा हिस्सा व्हायला आवडले असते असे प्रियांका यावेळी म्हणाली. या मालिकेतील कुंटुंबाभोवती फिरणारे कथानक त्यामधील खाद्यपदार्थाची मेजवाणी ही अप्रतिम असल्याचे प्रियांकाला म्हटले. २००० ते २००८ च्या दरम्यान आठ वर्ष, आठवडय़ातले सातही दिवस ही मालिका प्रसारित केली जात होती. छोट्या पडद्यावर सातत्यपूर्ण प्रसारणामध्ये हा एक इतिहासच आहे. २००० साली एकताच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेली ‘क्यूँ की सास भी कभी बहू थी’ ही मालिका छोटय़ा पडद्यावर दाखल झाली. तेव्हापासून ती जी सुरू झाली ती थांबायचे नावच घेईना. शंभर, दोनशे, चारशे करत हजार भाग झाले तरी ही मालिका एकता कपूरला थांबवावीशी वाटत नव्हती. स्मृती इराणी या मालिकेत सून म्हणून आली होती. त्यानंतर आई, सासू असं करत करत मालिकेने उडय़ांवर उडय़ा घेतल्या आणि ‘एकताकृपे’ने स्मृती ‘बा’च्या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचली. तोपर्यंत आजूबाजूच्या टेलिविश्वातही क्रांती झाली. रिअॅलिटी शोचे स्तोम मोजले तेव्हा कुठे एकताला तिच्या सगळ्याच ‘क’ मालिकांचा गाशा गुंडाळावा लागला.
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेल्या बर्याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बेवॉच’ हॉलिवूडपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या काही सेकंदांसाठी दिसली आहे. त्यामुळे हा ट्रेलर प्रियांकाच्या चाहत्यांची निराशा करणारा असा आहे. पुढच्या वर्षी २६ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बेवॉच’ हा चित्रपट, याच नावाच्या गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ मुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.