स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ सालापासून केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) आहेत. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र राहुल गांधी प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
मात्र पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राहुल गांधी यांनाच अमेठी मतदारसंघामधून पराभूत केलं आणि त्या पुन्हा एकदा खासदार झाल्या. Read More