बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजेच अमिताभ बच्चन यांना क्वीन एलिझाबेथ २ आणि प्रिन्स फिलीप यांनी बकिंगहम पॅलेसमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. पण, बिग बी तेथे जाणार नसल्याचे कळते. या महिन्याच्या अखेरीस बकिंगहम पॅलेसमध्ये होणा-या भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी नाकारले आहे. ९० वर्षीय राणी एलिझाबेथ २ यांनी दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ हे सदर कार्यक्रमाला जाऊ शकत नसल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे कळते. पण, इतक्या भव्य कार्यक्रमाचे आमंत्रण बिग बींनी नाकारण्यामागे काय कारण असेल? मिड डे च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी कामासाठी आधिच तारखा दिल्या असल्यामुळे लंडन येथे होणा-या गालामध्ये ते जाऊ शकणार नाहीयेत. पण, त्यांनी आधीच याबाद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या सन्मानाबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. मात्र, सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असलेल्या अमिताभ यांनी याबद्दल कोणतीच माहिती अद्याप दिलेली नाही.

बिग बींनी इतके मोठे आमंत्रण नाकारण्यामागचे नेमके कारण काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न इंडियन एक्स्प्रेस संकेतस्थळाने केला. तेव्हा कळळं की, राम गोपाल वर्मा याच्या ‘सरकार ३’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण कार्यक्रमाची ते तयारी करत आहेत. तसेच, ते लवकरच आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार आहेत. याव्यतिरीक्त ते अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगॉन’ चित्रपटातही झळकणार आहेत. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या भूमिका आहेत. तसेच, ते गौरांग दोशीच्या ‘आँखे २’ चित्रपटातही काम करत आहेत. त्यामुळे अमिताभ यांचे वेळापत्रक पूर्णपणे कामाने भरल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queen elizabeth ii invited amitabh bachchan to buckingham palace he is too busy to go