सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. सध्या राखी अनेक ठिकाणी फिरताना दिसते. कधी ती गरीब मुलांना मदत करते तर कधी लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करते. पण सध्या राखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने लाँग व्हाइट टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. तसेच तिने तोंडाला मास्क लावले असून हातात सॅनिटायझर घेतले आहे.

आणखी वाचा : ‘आईला सांग कमी मुलं जन्माला घाल’, भीक मागणाऱ्या मुलांना मदत करत राखीने दिला सल्ला

कारमधून खाली उतरताच राखी आजूबाजूला सॅनिटाइज करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान एका फोटोग्राफर तिला प्रश्न विचारला की कंगना बोलत होती देशाची परिस्थिती फार बिकट आहे, मोदीजी बरोबर आहेत की चुकीचे, करोना रुग्णांना अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. तुझे यावर काय मत आहे.

उत्तर देत राखी म्हणाली, ‘कंगना, तू देशाची सेवा कर. तुझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तर थोडे पैसे ऑक्सिजन खरेदीसाठी खर्च कर आणि लोकांना देखील मदत कर.’