बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंग आणि मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्याचे बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. तसेच ही बाजीराव- मस्तानीची जोडी त्यांच्या फॅशनेबल आऊटफिटसाठी देखील लोकप्रिय आहे. नुकताच रणवीर आणि दीपिकाने आयफा अवॉर्ड्स २०१९ला हजेरी लावली असून रेड कार्पेटवर जलवा दाखवला आहे. दरम्यान त्या दोघांनीही परिधान केलेल्या आऊटफिटची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र त्यांचा हा आऊटफिट नेटकऱ्यांना फारसा आवडलेला दिसत नाही. नेटकऱ्यांनी बाजीराव मस्तानीला ट्रोल केले आहे.

रणवीरने आयफा अवॉर्डसाठी निळसर रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. या आऊटफिटवर त्याने काळ्या रंगाची काठी हातात घेतली आहे. या हटके लूकमध्ये रणवीर अत्यंत हॅन्डसम अंदाजात दिसत आहे. तर दुसरीकडे दीपिकाने जांभळ्या रंगाचा लॉंग गाऊन परिधान केला आहे. ती या लूकमध्ये अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर अंदाजात दिसत आहे.

रणवीर आणि दीपिकाचा हा ग्लॅमरस पण हटके अंदाज चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दोघांनाही ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. एका नेटकऱ्याने ‘कार्टून दिसत आहेत’, ‘हा क्यूट नाही जोक आहे’ , ‘यांना कोणी तरी समजवा’ असे म्हणत दोघांनाही ट्रोल केले आहे.

काही दिवसांपूर्वी दीपिका ‘लिव्ह लव लाफ’ फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिज लॉन्च दरम्यान रणवीरची पत्नी असल्याचा उल्लेख करण्यास विसरली होती. त्यावरुनही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.

आणखी वाचा : अक्षय कुमारने केला मुंबई मेट्रोतून प्रवास, अनुभव सांगताना म्हणाला…

दीपिका लवकरच ’83’ चित्रपटात रणवीर सिंगसह झळकणार आहे. लग्नानंतरचा दीपिका आणि रणवीरचा हा पहिला एकत्र चित्रपट असणार आहे. त्यामुळे त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यानंतर दीपिका मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट दिल्लीमध्ये अॅसिड हल्याने पिडीत लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. दीपिका चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे.