कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली झी मराठी वाहिनीवरील मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ मालिकेत एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांवर आधारित अशीही मालिका अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरली होती. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला खरा पण तरीही दोनशे भागांच्या टप्प्यापर्यंत ही मालिका पोहोचली होती. आता हिच मालिका हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव ‘रात का खेल है सारा’ असे ठेवण्यात आले असून अॅन्ड टीव्ही वाहिनीवर ही पाहायला मिळणार आहे. २९ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यामुळे हिंदीमधील मालिका पाहण्यासाठी चाहते आतुर असल्याचे दिसत आहे. सध्या या मालिकेचा दुसरा भाग ‘रात्रीस खेळ चाले २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेच्या पहिल्या सत्रात शेवंताच्या खूनाचे कथानक दाखवण्यात आले होते. पोलिसांनी अथक प्रयत्न करुनही तिच्या खुनाचा उलगडा झाला नव्हता. सध्याचे कथानक पाहाता शेवंताने आपल्या नवऱ्याच्या आत्महत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिला अपयश आले. त्यामुळे आण्णा नाईक यांनीच तिचा खून केला होता का? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratris khel chale serial dub into hindi as raat ka khl sara avb