‘सैराट’ या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. कलाक्षेत्रातील तिच्या वावराकडे सर्वांचंच लक्ष असतं. आता रिंकू झी टॉकीजच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करताना दिसणार आहे. त्याची झलक तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झॉ टॉकिज’च्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘आली ठुमकत नार लचकत’ या गाण्यावर रिंकूच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्स झलक पाहायला मिळतेय. त्याचसोबत या डान्ससाठी ती कशाप्रकारे तयारी करतेय, हेसुद्धा यामध्ये दाखवण्यात आलं आहे. २८ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे.

‘सैराट’नंतर रिंकूचा ‘कागर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या. आता रिंकूचा ‘मेकअप’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिंकू एका ग्रामीण भागातील मुलीची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru dance performance in award show watch video ssv