सतत मस्तीखोर अंदाजामुळे चर्चेत असणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. लवकरच रितेश देशमुख अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मर जावां’ चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. ही जोडी काही दिवसांपूर्वी ‘एक व्हिलन’ या चित्रपटात एकत्र झळकली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यांना पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. पण सध्या चर्चा सुरु आहे ती रितेशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सिद्धार्थच्या फोटोची.
नुकताच रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर सिद्धार्थचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थने एका मॉडेलसह पोज दिली आहे. दरम्यान त्या मॉडेलने ट्रान्सपरंट आणि चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो सिद्धार्थच्या करिअरच्या सुरुवातीचा आहे. फोटो शेअर करत रितेशने ‘हाय मैं मर जावा. ही तर पोजिंगची हाइट आहे’ असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर रितेशने या तुझ्या फोटोला एक्सपर्ट कमेंट मिळायलाच हव्यात असे म्हणत तारा सुतारीया, राकुलप्रीत यांना तो फोटो टॅग केला आहे.
हाय मैं #Marjaavaan @SidMalhotra – ufffff ये तो posing की height हो गयी!!!! pic.twitter.com/UuPAUeifXf
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 13, 2019
Need your expert comment on this @zmilap @TaraSutaria @Rakulpreet #MarjaavaanOn15thNov
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 13, 2019
रितेशने सिद्धार्थचा हा फोटो शेअर केल्यानंतर सिद्धार्थने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मॉडेल म्हणून मी किती प्रोफेशनल होतो. माझ्या करिअरमधील संघर्षाचे दिवस’ असे सिद्धार्थने म्हटले आहे. पण सिद्धार्थचा हा फोटो पाहून चाहत्यांना हसू अनावर झाले आहे.
See how Professional I was as a model @PatelDevansh never questioned anything !…. struggling days hai main #Marjaavan https://t.co/KonPMqedk1
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) November 10, 2019
आणखी वाचा : रितेश देशमुखने अक्षयकुमारची नक्कल केलेला व्हिडीओ पाहिलात का??
निखिल अडवाणी निर्मित ‘मर जावां’ चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे कथानक प्रेमकथेवर आधारित असून हा चित्रपट पुढील वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ-रितेशसोबत अभिनेत्री तारा सुतारियादेखील स्क्रिन शेअर करणार आहे.
