बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी २००७ मध्ये आपल्या प्रेमाची कबूली देऊन त्यांच्यातील प्रेमाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला होता. बॉलिवूड कपलमध्ये प्रेमाची चर्चा नवी नसली तरी, त्यांच्या वयातील अंतरामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. २०१२ मध्ये दोघांनी राजेशाही थाटात विवाह थाटला.  लग्नाला चार वर्षे उलटल्यानंतर  मंगळवारी सैफ आणि करिना आई-वडिल झाले आहेत. करिनाने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात आज सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला. करिना-सैफच्या घरी छोट्या नवाबाचे आगमन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफचे पहिले लग्न त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी असणाऱ्या अमृता सिंहशी झाले होते. दोघांच्या वयातील अंतरा ऐवढा त्यांचा संसार १२ वर्षेच टिकला. २००४ मध्ये सैफ आणि अमृता एकमेकांपासून वेगळे झाले. १९९२ मध्ये सैफच्या लग्नात करिना १२ वर्षाची होती. करिनाने सैफच्या लग्नाला देखील हजेरी लावली होती. यावेळी तिने सैफचे अंकल असे संबोधून अभिनंदन केले होते. ज्यावेळी सैफ पहिल्या मुलाचा बाबा झाला त्यावेळी करिना अवघ्या १३ वर्षाची होती. अर्थातच सैफची मुलगी  सारा आणि करिना यांच्यामध्ये  १३ वर्षाचे अंतर आहे.

करिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना सैफ म्हणालेला की, करिना आणि माझ्या नात्यातील हे प्रतिबिंब आहे. बाळाने आमच्या नात्याला पूर्णत्व मिळाले. आमचे येणारे बाळ काहीसे माझ्यासारखे असेल तर काहीसे तिच्यासारखे असेल. ही खूप छान भावना आहे. मध्यंतरी करिना आणि सैफ त्यांच्या बाळाला सैफिना असे संबोधणार असल्याच्या चर्चा होत्या. करिनाने एका चॅट शो दरम्यान आपल्या बाळाचे नाव सैफिना ठेवणार असल्याचे म्हटले मिश्किलपणे म्हटले होते. पण, सोशल मिडीयावर तिच्या या वक्तव्याला जास्तच गांभीर्याने घेत अनेकांनी तिच्या होणा-या बाळाचा उल्लेख सैफिना असा करण्यास सुरुवात केली होती. सरतेशेवटी सैफ अली खान याने या चर्चांना पूर्णविराम देत आपण आपल्या बाळाला सैफिना म्हणणार नसल्याचे सांगितले.

आपल्या बाळाच्या जन्मानंतर सैफ म्हणाला की, तुम्हा सर्वांना सांगताना आम्हाला आनंद होत आहे की, आमच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. २० डिसेंबर २०१६ ला तैमुर अली खान पतौडीचा जन्म झाला. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी आम्हाला समजून घेतले आणि त्यांनी जो काही पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच, आमचे चाहते आणि शुभेच्छुक यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचे आभार मानतो. सर्वांना नाताळच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा.. सैफ आणि करिनाकडून तुम्हाला खूप सारे प्रेम.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan and kareena kapoor age difference