बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आजही कुटुंबीयांसोबत एकत्र राहताना दिसतो. त्याचे भाऊ सोहेल खान आणि अरबाज खानवर प्रचंड प्रेम आहे. तो नेहमी त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. सोहेलने सलमानच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली असून दिग्दर्शनही केले आहे. पण एकदा असे काही घडले होते की सलमान सोहेल खानला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून निघून गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानने २०१९मध्ये द कपिल शर्मा शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. ‘खूप वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. आम्ही तिघं भाऊ टार्झन हा चित्रपट पाहात होतो आणि दगडांवर खेळत होतो. त्यावेळी खेळात इतका मग्न झालो की मी सोहेलवर दगड फेकला. तेव्हा सोहेल खूप लहान होता. तो कचऱ्याच्या डब्यामागे लपला होता. पण जेव्हा तो तिथून बाहेर आला तेव्हा जोरजोरात रडू लागला. तो रक्तबंबाळ झाला होता. ते पाहून मी आणि अरबाज प्रचंड घाबरलो आणि तेथून पळून गेलो’ असे सलमान म्हणला होता.
आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीनं सांगितला इंटीमेट सीनच्या शूटिंगचा किस्सा, म्हणाली…

सोहेलच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर त्याने दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. त्याने ‘औजार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर त्याने ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाची कथा तसेच निर्मिती सोहेलने केली होती. त्यानंतर त्याने ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील तोच होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan hit sohail khan with stones during playing games and ran away avb