भारतात प्रत्येकाला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि तो प्रश्न म्हणजे बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार? बी-टाऊनमधील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ असलेल्या सलमानच्या पिळदार शरीरयष्टीवर त्याचे चाहते भाळले आहेत. चित्रपटगृहात पडद्यावर ‘भाईजान’ची एण्ट्री झाली रे झाली त्याचे चाहते शर्ट काढून स्वागत करतात. सलमानच्या भोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय आणि चाहत्याचं त्याच्यावरील प्रेम त्याच्या स्टारडमची ओळख करून देतं. पण, जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा हा ‘चुलबुल पांडे’ यापासून काहीसा पळ काढण्याचा प्रयत्न करतो. या अभिनेत्याचं ऐश्वर्या राय ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं आहे. सध्या रोमानियन अभिनेत्री लुलिया वंतुर हिला तो डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनी आजवर कधीच त्यांच्या नात्याची उघड ग्वाही दिलेली नाही. पण लुलिया बऱ्याचदा सलमानच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये आणि त्याच्यासोबत बाहेर जातानाही दिसते. त्यामुळे त्यांच्या प्रेमासंबंधांच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : …म्हणून ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीनं सहकलाकाराच्या थोबाडीत मारली

प्रसारमाध्यमांकडून लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला की सलमान नेहमीच सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो. पण, हा अभिनेता लहान मुलांवर असलेलं त्याचे प्रेम वेळोवेळी दाखवून देतो. लग्नपद्धती विषयी असलेल्या भावना सलमानने कधीच बोलून दाखविल्या नाहीत, मात्र आपल्याला मुलं असावीत असं त्याला वाटतं. ‘फिल्मफेअर’ मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, तो म्हणाला की, ‘माझ्या हातातून वेळ निघून चाललीय असं मला वाटत नाही. पण जेव्हा मी ७० वर्षांचा असेन आणि माझं मुलं जवळपास २० वर्षांचं असेल तेव्हा मला नक्कीच याची जाणीव होईल. माझ्या आई-वडिलांनी माझ्या मुलाला पाहावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच पुढच्या दोन-तीन वर्षांत मला मुलं असावं असं मला वाटतं.’ गेल्या वर्षी एका कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणालेला की, ‘लग्नाबद्दल मला शंका वाटतेय पण माझी दोन-तीन मुलं असतील. लग्न केल्याशिवाय मुलं होणं कठीण आहे हेसुद्धा मला माहितीये पण मी सांभाळून घेईन.’

वाचा : जाणून घ्या ‘जेठालाल’ची दर दिवसाची कमाई

सध्या बॉलिवूडमध्ये सरोगसीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सलमानच्या या उत्तरामुळे तो सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देणार की मुलं दत्तक घेणार हे येणारी वेळच सांगेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan says he wants to have children but no marriage