सलमान खान पुन्हा त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. पण, यावेळी तो अभिनेता म्हणून नाही तर गायक म्हणून तुमच्या समोर येईल. त्याच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या आगामी ‘हिरो’ चित्रपटासाठी त्याने ‘मै हूँ हिरो तेरा’ हे गाणे गायले आहे.
या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून गाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच सलमानने हे गाणे ट्विटरवर पोस्ट केले आहे.

सलमानने चित्रपटात गाण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी, त्याने किक आणि वॉण्टेडमध्ये गाणे गायले आहे. पण, दुस-या चित्रपटात गाणे गाण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. ‘हिरो’चा फर्स्ट कट पाहिल्यानंतर सलमानने चित्रपटासाठी गाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या इच्छेखातर मध्यरात्री स्टुडिओ सुरु करून हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर सलमानने संपूर्ण टीमला ब्रेकफास्ट ट्रीटही दिल्याचे कळते. निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘हिरो’ २५ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.