बॉलीवूडच्या ‘खान’दानातील कटूता आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे आजवर अनेक घटनांतून समोर आले आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान बॉलीवूडचा बादशहा शाहरुखसाठी आपल्या आगामी बजरंगी भाईजान चित्रपटाचे खास स्क्रिनिंगचे आयोजन करणार असल्याचे समजते. असे झाल्यास या दोन कलाकारांमधील शीतयुद्ध संपुष्टात आल्याचे द्योतक मानावे लागेल. नुकतेच काही दिवसांपूर्वी शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बजरंगी भाईजानचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला होता. नायक होण्यापेक्षा एखाद्याचा भाऊ (भाईजान) होण्यावर माझा जास्त विश्वास असल्याचे शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यामुळे दोघांमध्ये आता सर्वकाही आलबेल असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-07-2015 at 06:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan to hold bajrangi bhaijaan screening for shah rukh khan