अंडरवॉटर फोटोशूट केल्यामुळे काही दिवसापूर्वी चर्चेत आलेली अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई झाली आहे. शुक्रवारी (१२ जुलै )समीराच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. ही माहिती समीराने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यासोबतच तिने तिच्या मुलीचा एक फोटोही शेअर केला आहे. यापूर्वी समीराला एक लहान मुलगा आहे.

‘आज सकाळी आमच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं आहे’, असं म्हणत समीराने तिच्या लहान बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. समीराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर मोठ्या संख्येने शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.