‘त्रिदेव’, ‘जुर्म’ आणि ‘बटवारा’ या चित्रपटांतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री संगीता बिजलानीने १९९७ साली चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. आता ती ‘शाब’ या चित्रपटाने पुन्हा रुपेरी पडद्यावर पुर्नपदार्पण करत आहे.
तीन वर्षांच्या कालावधीनंतर चित्रपट दिग्दर्शन करत असलेले दिग्दर्शक ओनीर यांनी या बातमीस दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, हो, संगीता बिजलानी चित्रपटातील मुख्य भूमिकांपैकी एक भूमिका साकारले. मी इतर काही कलाकारांशी चर्चा करत असून, चित्रपटातील इतर पात्रे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठरवली जातील. यात मी नवोदिल कलाकारांना रुपेरी पडद्यावर आणणार आहे. तसेच, या चित्रपटाचे चित्रीकरण जूनपासून दिल्ली येथील सुरु करण्यात येईल. जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशा चार टप्प्यांमध्ये या चित्रपटाचे दिल्लीत चित्रीकरण करण्यात येणार आहे. संजय सुरी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeeta bijlani to make a comeback on screen after 20 years with shab