कॉलेज मध्ये अभ्यास करता करता अजून एक चांगली गोष्ट होते ती म्हणजे प्रेम.  एकमेकांना पाहताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडणे, एकमेकांबरोबर व्हाटसअॅप वर रात्रंदिवस चॅट करणे , जेवढे क्षण एकमेकांसोबत घालवता येतात तेवढे घालवणे  यात कॉलेजचे दिवस कसे भुर्रकन् उडून जातात , ते कळतंच नाही. काही प्रेमकहाण्या लग्नापर्यंत पोहचतात तर काही कॉलेजमध्येच संपतात.  कॉलेज नंतर सुरु होत ते नोकरी विश्व आणि पुन्हा तेच  चक्र सुरु होते. मग पुन्हा नवीन व्यक्ती आणि नवीन प्रेम. पुन्हा आपण एखादया  नवीन व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि त्या व्यक्तीकडे  टक लावून पाहत राहतो आणि मुख्य म्हणजे सतत आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा प्रयत्नही करतो …  हे सर्व सांगण्यामागे सध्या कारण  म्हणजे सोमवार ते शुक्रवार ८:३० वाजता झी युवावर लागणारी मालिका ‘लव्ह लग्न लोचा’ .. आणि या मालिकेमध्ये आलेली नवीन मुलगी  सौम्या म्हणजेच  अक्षया गुरव. आणि हिच्या पदार्पणानंतर, सुमीत म्हणजेच ओमकार गोवर्धनचा बदललेला स्वभाव.

सौम्या हे कॅरेक्टर म्हणजे एक अतिशय सुंदर आणि डॅशिंग मुलगी. ती तिला जे हवे तेच करते ,आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण ती उस्फुर्तपणे जगते. ती आल्यानंतर सेटवरचं वातावरणच पूर्णपणे बदलून गेलय आणि असं म्हंटल जातंय की सेटप्रमाणेच सध्या अक्षयाच्या पूर्णपणे विरुद्ध, अगदी शांत स्वभावाच्या ओमकारचं सुद्धा  वागणं अचानकच बदललंय.  हा पट्ठ्या तसा कामाच्या बाबतीत नेहमीच फोकस आहे . पण प्रेमाचा ट्रॅक सुरु असलेल्या या मालिकेत एक वेगळीच एनर्जी सध्या ओमकारमध्ये दिसते आहे. अक्षया … माफ करा सौम्यासाठी काय करू आणि नको असं ओमकारला .. ओह्ह म्हणजेच सुमीतच झालंय, असं सेटवर सगळ्यांचं म्हणणं आहे. आता या “सुमीत आणि सौम्याच्या ” प्रेमप्रकरणाचं काय होतंय याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेय . तुम्हाला काय वाटत ?