बॉलिवूड ‘खान’दानातील एक खान शाहरुख आणि सनी लिओन या दोघांची जोडी लवकरच आता मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आगामी ‘रईस’ या चित्रपटात या दोघांनी एक ‘आयटम सॉंग’सादर केले आहे. ‘कुर्बानी’ या चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ या गाजलेल्या गाण्याला नवा ढंग देऊन ते चित्रपटात सादर करण्यात येणार आहे. मूळ गाणे फिरोज खान व झीनत अमान यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात १९८० च्या दरम्यानचा गुजरात मधील काळ दाखविण्यात आला आहे. चित्रपटात शाहरुखसह नवाझुद्दीन सिद्दिकी, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हे कलाकार आहेत. मुंबईत मेहबुब स्टुडिओत बारचा सेट उभारुन या आयटम सॉंगचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रीकरणात ७० सहकलाकार सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan and sunny leone item song