बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटरवरून शुभेच्छा देताना त्यांनी एक संदेशही लिहिला. मात्र यामध्ये लक्ष वेधणारी गोष्ट अशी की, शत्रुघ्न सिन्हा यांनी कादर खानऐवजी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत या शुभेच्छा दिल्या. याच चुकीमुळे सध्या सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ट्विट करताना नेहमीच त्यांचा फोटो पोस्ट करत असतात. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी चुकून त्यांचा फोटो पोस्ट केल्याने सोशल मीडियावर एकच खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी उपरोधिक टीकाही केली. काहींनी तर सेलिब्रिटींचे फोटो पोस्ट करत दुसऱ्याच व्यक्तींना शुभेच्छा देणारे पोस्ट लिहिले. त्यामुळे ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे असं म्हणायला हरकत नाही.
https://twitter.com/ShatruganSinha/status/922027287419277312
https://twitter.com/ShatruganSinha/status/922171420859232256
इशा देओलच्या तान्हुलीचे फोटो पाहिलेत का?
या चुकीनंतर शत्रुघ्न यांनी माफी मागत आणखी एक ट्विट केलं. ‘मी आणि अमिताभ यांनी ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक योगदानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’ असं त्यांनी लिहिलं. या स्पष्टीकरणानंतरही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया थांबल्या नाहीत.
Remembering the legendary Singer Lata Mangeshkar on Amit Shah's bday pic.twitter.com/gMhfncDHxA
— SwatKat? (@swatic12) October 22, 2017
https://twitter.com/supaarwoman/status/922345299330326528
Sir, I was remembering nelson mandela on world peace day . pic.twitter.com/pbUwVyc17T
— Hunटरर ♂ (@nickhunterr) October 22, 2017
Sir I got remembered of Om Puri sahab after seeing your tweet. pic.twitter.com/0W9y0MvwrV
— Haritha Varanasi (@vharitha17) October 22, 2017
Remembering Jitendra on his bday. pic.twitter.com/2KTWS5EoZK
— V (@vigiciann) October 22, 2017