सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या प्रेक्षकांना नवीन काहीतरी देण्याच्या प्रयत्नात झी युवा वाहिनीने अनेक नवीन आणि फ्रेश कार्यक्रम त्यांच्या तरुण प्रेक्षकांना दिले आहेत आणि आज हे कार्यक्रम आजच्या तरुणाईच्या जिवाभावाचे झाले आहेत.  याच वेगळेपणाच्या मार्गावर पाऊल टाकत, झी युवाने एक नवीन पोलीस आणि गुन्हेगारी यांच्यातील वास्तव वर्तवणारी एक नवीन मालिका आणली ती म्हणजे ” शौर्य – गाथा अभिमानाची “. ही मालिका आणत असताना बऱ्याच आक्षेपांना वाहिनीला तोंड द्यावे लागले. मात्र तरीही आपल्या वेगळेपणावर आणि त्याच बरोबर आपण दाखवत असलेल्या कन्टेन्ट बद्दल झी युवाच्या सर्वच टीमला खात्री होती की आपण इतरांपेक्षा नक्कीच वेगळ्या दर्जाचा कार्यक्रम बनवत आहोत.  आणि झालेही तसेच, शुक्रवार आणि शनिवार रात्री ९ चा प्राईम टाइम आणि मालिकेत हिरोच्या भूमिकेत गुंडाना आणि गुन्हेगारीला निधड्या छातीने तोंड देणारा पोलीस अधिकारी प्रेक्षकांना भावला. मालिकेचे वेगळपण क्षणाक्षणाला प्रत्येकालाच जाणवले. पहिला भाग अतिरेक्यांचा मुंबईवरील २६/११ चा हल्ला , दुसरा भाग “आमीरजादा केस” , तिसरा भाग  “१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्ट ” चौथा भाग महिला पोलीस विशेष .. “ हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांचे  शौर्य  या मालिकेच्या भागांनी  लोकांची उत्कंठा उत्तुंग पातळीवर नेऊन ठेवली. आणि हे नुसतं बोलण्याकरता नसून बार्क चे रँकिंग सुद्धा हेच सांगतात . शहर असो किंवा गाव, सध्या शौर्य – गाथा अभिमानाची कार्यक्रम अनेकांचा आवडता कार्यक्रम आहे . येणारा प्रत्येक शुक्रवार आणि शनिवार एक नवीन पोलीस अधिकारी आणि त्याची शौर्यगाथा या कार्यक्रमामुळे सामान्य जनतेसमोर नाट्यमयरित्या उलगडणार आहे. येत्या शुक्रवारी, रात्री ९ वाजता शेरू ह्या गुंडाची मर्डर केस सोडवताना निवृत्त पोलीस आयुक्त सुरेश वालिशेट्टी यांनी दाखवलेलं शौर्य आणि कौशल्य त्याचबरोबर  नवीन नवीन घटनाचक्र आणि उलगडलेली रहस्य हे अनुभवायला मिळणार आहे. तर शनिवार रात्री ९ वाजता जेव्हा शेंडे मिसळ नावाचा पोलिसचं  एक  अट्टल गुन्हेगार होतो आणि पोलीस हवालदार राजेश धनवटे यांनी अश्या गुन्हेगाराचा जोखीम घेऊन कशा प्रकारे खात्मा केला, ही अशी रंजक कथा आहे . या आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा लवकरच झी युवावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

क्राईम शो म्हटला की नेहमीच प्लॉट महत्त्वाचा मानला जातो. मग त्या प्रमाणे तो गुन्हा कसा घडला आणि त्याचे विश्लेषण करण्यात अख्खा एपिसोड खर्ची होतो. मग तो इतर कोणत्याही वाहिनीवरील कोणतंही क्राईम शो असेल. झी युवा सारखी वाहिनी मात्र, याला नक्कीच अपवाद ठरली आहे. प्रत्येक वाहिनीची विचारधारा वेगळी असते. आपल्या प्रेक्षकांना काय नवीन आणि वेगळे दयायचे हे प्रत्येक प्रोग्रामिंग टीम रिसर्च करून ठरवत असते. त्या मागे अनेकांची भरपूर मेहनत असते आणि ती मेहनत आपल्याला त्या कार्यक्रमाद्वारे दिसतेच.  सध्या टीव्ही जगतात फार थोडे क्राईम शो सुरु आहेत. आणि तेही सगळे सारखेच. प्रत्येक वाहिनी ही एकमेकांशी स्पर्धा करताना बऱ्याच वेळा एकमेकांचे कार्यक्रम सुद्धा तंतोतंत सारखेच बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे क्राईम शो हे कोणत्याही वाहिनीवर लागले तरीही ते सारखेच दिसतात. आणि शेवटी प्रेक्षकांची निराशा होते.

शौर्य – गाथा अभिमानाची या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे लेखक अजय ताम्हाणे यांनी केले आहे.