काही सेलिब्रेटी सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्तपणे आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. मग ते बॉलिवूड सेलिब्रेटी असो किंवा टीव्ही सेलिब्रेटी. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी ही जोडी त्यापैकीच एक. शेफाली आणि पराग यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघंही एअरपोर्टवर एकमेकांना लिपलॉक किस करताना दिसत आहे. पण या व्हिडीओमुळे आता दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी यांचा एअरपोर्टवर एकमेकांना किस करताना हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून या व्हिडीओमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांचं अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करणं नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘एवढं प्रदर्शन करण्याची काय गरज? विवाहित आहात तर मग घरी करा ना हे सर्व.’ अशाच प्रकारे इतरही अनेक युजर्सनी शेफाली आणि परागच्या या व्हिडीओवर टीका केली आहे.

शेफाली आणि पराग यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर या दोघांच्या लग्नाला ७ वर्षं झाली आहेत. शेफालीचं परागशी हे दुसरं लग्न आहे. त्याआधी शेफालीचं ‘मीत ब्रो’ फेम हरमीत सिंहशी लग्न झालं होतं. पण त्याचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर ५ वर्षांनी ते दोघं वेगळे झाले. शेफालीनं हरमीतवर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोपही केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shefali jariwala parag tyagi trolled for liplock kiss on airport video goes viral mrj