बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शहा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आता शेफालीने दिग्दर्शनातही पाऊल टाकलं आहे. शेफालीने ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ या लघुपटाचे चित्रीकरण केले आहे. या लघुपटाचे कौतुक फक्त चाहतेच नाहीत तर समीक्षकांनीही केले आहे. तिच्या या लघुपटाने युट्यूबवर १० दिवसात १ मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला आहे. ही गोष्ट एका दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकासाठी नक्की महत्वाचा आहे.
इतकेच नव्हे तर, चित्रपट त्याच्या मार्मिक कथानकासाठी देखील कौतुकाचा विषय ठरत असून त्याचे लेखन देखील शेफालीनेच केले आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर सुरू असलेल्या या कौतुकाने रोमांचित शेफाली शहाने आभार व्यक्त करताना लिहिले की, ” ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ या लघुपटाला मिळालेला प्रतिसाद आणि निरपेक्ष प्रेमामुळे मी भारावून गेले आहे. मी आणखी काही मागू शकत नाही आणि माझी कथा सगळ्यांना आवडली त्यांचे आभार मानते”
आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक
या सोबतच, विपुल अमृतलाल शहा यांच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट ‘ह्यूमन’ मधील तिच्या भूमिकेमुळे शेफाली चर्चेत आहे. मेडिकल थ्रिलर मधील तिचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. तसेच, चाहते डार्लिंग्स आणि डॉक्टर जी सारख्या मेगा चित्रपटांमध्ये तिला पाहायला उत्सुक आहेत. ‘दिल्ली क्राइम’ जीवनातील वास्तविक अपराध आणि घटनांवर आधारित कहाणी आहे, ज्यामध्ये शेफालीने मुख्य भूमिका साकारली असून आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली.