होळी असल्यामुळे सध्या देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण रंगामध्ये न्हाऊन निघत आहे. मग यात बॉलिवूड सेलिब्रिटी मागे राहिले तर नवलंच नाही का? अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील रंगपंचमीचा आनंद लुटत असून तिने टिकटॉकवर होळी खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
सध्या तरुणाईमध्ये टिकटॉकची जबरदस्त क्रेझ आहे. आतापर्यंत अनेक तरुण-तरुणी टिकटॉकवर सक्रीय आहे. यात शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. शिल्पा मोठ्या प्रमाणावर टिकटॉक व्हिडीओ करत असून होळीच्या निमित्तानेही तिने व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
@theshilpashettySaal ke harr din, rangon se bhari rahe aapki zindagi.Sabko Happy Holi!##HappyHoli ##fantasticholi ##fyp ##tiktokindia ##festival ##colours Rang Barse Bheege Chunarwali – Amitabh Bachchan
आणखी वाचा- भांग पिऊन अभिनेत्रीने केला ‘नागिण डान्स’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
शिल्पाने अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे’ या गाण्यावर ठेका धरल्याचं दिसून आलं. तसंच तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या. ‘तुमचा वर्षातला प्रत्येक दिवस विविध रंगांप्रमाणे उजळून यावा’, सगळ्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणत शिल्पाने साऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तिच्याप्रमाणेच अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियानेही टिकटॉकच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या.