शिल्पा शिरोडकर मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे ही एका सरळ रेषेत जाणारी बातमी नाही. शिल्पा शिरोडकर ‘सौ. शशी देवधर’या चित्रपटाची निर्मिती करून आपली आजी मीनाक्षी शिरोडकर यांचे मराठी चित्रपटाशी एकेकाळी असलेले नाते पुनरुजीवीत करीत आहे असे म्हणायला हवे. मीनाक्षी शिरोडकर यांनी चाळीसच्या दशकात ब्रह्मचारी चित्रपटात ‘यमुनाजळी खेळू कान्हा’या गाण्यात बेदींग सूटमध्ये दर्शन घडवल्याने त्या काळात सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडाली, गिरगावातील मॅजेस्टीक चित्रपटगृहावर निदर्शने केली. मीनाक्षीताईंनी ब्रॅन्डीची बाटली, देवता, अर्धांगी, अमृत, माझं बाळ, चिमुकला संसार इत्यादी चित्रपटातून भूमिका केली.
मीनाक्षीताईंच्या दोन नातींपैकी मोठ्या नम्रताने ‘अस्तित्व’ या तर छोट्या शिल्पाने ‘सौभाग्यवती सरपंच’ या मराठी चित्रपटातून भूमिका साकारत आजीची मराठीची परंपरा जपली आणि आता शिल्पाने ‘ऑरेंज ट्री प्रॉडक्शन’ अशी निर्मिती संस्था स्थापन करून ती परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
शिल्पाच्या ‘सौ. शशी देवधर’चे दिग्दर्शन अमोल शेटगे याचे आहे. तर अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शिकर आणि सई ताह्मणकर यांच्या या चित्रपटात प्रमूख भूमिका आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shirodkar prodction house