कपड्यांचे उत्पादन आणि डिझाइन करणाऱ्या एका कंपनीने सप्टेंबरमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता निर्मात्यांसह श्रद्धालाही पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. ‘हसीना पारकर’च्या प्रमोशनदरम्यान एजेटीएम (AJTM) या फॅशन लेबलचा प्रचार न केल्याने कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार महानगर दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निर्मात्यांसह श्रद्धालाही पोलीस चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती कंपनीचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी दिली.

वाचा : जाणून घ्या, क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल

‘एजेटीएम- एजे मिस्त्री अँड थिया मिनहास’ या ब्रँड लेबल अंतर्गत एम अँड एम डिझाइन्स कंपनी कपड्यांचं उत्पादन करते. ‘हसीना पारकर’ चित्रपटाच्या माध्यमातून या कंपनीने पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीसाठी कपडे डिझाइन केले होते. एम अँड एम डिझाइन्स आणि स्विस एन्टरटेन्मेंटच्या निर्मात्यांमध्ये प्रमोशनदरम्यान श्रद्धा ब्रँडचा प्रचार करणार असल्याचा करार झाला होता. ‘चित्रपटासाठी निर्मात्यांना पुरवलेल्या कपड्यांच्या बदल्यात अभिनेत्री श्रद्धा कपूर ब्रँड आणि कंपनीचा प्रचार करण्याचे करारात ठरले होते,’ असे वकिलाने सांगितले. श्रद्धाने करारात ठरल्याप्रमाणे ब्रँडचा प्रचार न केल्याने कंपनीला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार असल्याची पूर्ण कल्पना श्रद्धा आणि स्विस एन्टरटेन्मेंटला देण्यात आल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor needs to report at police station