श्री गुरुदेव दत्त हे अनेकांचं आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा व्हाला यासाठी स्टार प्रवाहवर श्री गुरुदेव दत्त ही मालिका सुरु करण्यात आली. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसापूर्वीच या मालिकेतून दत्तजन्माची कथा उलगडण्यात आली. त्यानंतर आता गुरु-शिष्य परंपरेची नेमकी सुरुवात कशी झाली या उत्कंटवर्धक गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला श्री गुरुदेव दत्तांचा पहिला गुरु कोण? याचं उत्तर मिळणार आहे. गुरूपौर्णिमेपासूनच चातुर्मासाचा आरंभ होतो. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो. याच महिन्यात दत्तगुरु वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात विद्या संपादनासाठी जाणार आहेत. तत्पूर्वी दत्तगुरुंचे वडील म्हणजेच अत्री ऋषी त्यांना तीन प्रश्न विचारतात. या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यात दत्तगुरु कसे सफल होतात? हे पहाणं उत्सुकतेचं असेल. याच दिवसापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. आजही ही परंपरा अखंड सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दत्तसंप्रदायातील भक्तगण दत्तस्थानी जाऊन दर्शन घेतात. या पवित्र दिवसाचं महत्त्व मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे गुरुपौर्णिमेची अनोखी पर्वणी म्हणायला हवं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shre gurudev datta serial special episode ssj