‘एकुलती एक’या सिनेमातून रुपेरी पडद्यावर प्रवेश करणाऱ्या सिध्दार्थ मेननने कमी वेळातच तरूणींना आपल्या प्रेमाची भूल घातली आहे. ‘पोपट’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘स्लॅमबुक’ आणि ‘राजवाडे अँड सन्स’ नंतर आपण सिध्दार्थला मल्टीस्टारर ‘पोश्टर गर्ल’मधून पाहू शकणार आहात. या सिनेमात सिध्दार्थ पोश्टर गर्ल सोनालीसोबत रोमान्स करताना आपल्याला दिसणार आहे.
अर्जुन कलाल ही व्यक्तीरेखा साकारणारा सिध्दार्थ गावातील ‘पोश्टर गर्ल’च्या प्रेमात पडला आहे. तिच्यावर आपल्या प्रेमाची जादू करण्यासाठी सिध्दार्थ बरीच दिव्यं पार पाडताना दिसेल. एका बाजूला जितेंद्र जोशी तर दुसऱ्या बाजूला अनिकेत विश्वासराव अशा दोन जिगरबाज अभिनेत्यांबरोबर सिध्दार्थ ही पोश्टर गर्लच्या मागावर आहे.
सिध्दार्थच्या रुपाने सिनेसृष्टीला नवा चॉकलेट बॉय मिळाला हे म्हणायला हरकत नाही. बियर शॉप चालवणारा हा उस्ताद पोश्टर गर्लला आपल्या प्रेमात पाडतो की नाही हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth menon character in poshter girl