छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर आणि अभिनय क्षेत्रात सक्रिय असायचा. काही दिवसांपूर्वी त्याची ‘ब्रोकन बट ब्युटीफूल’ ही सीरिज प्रदर्शित झाली होती. सिद्धार्थ त्याच्या लव्ह लाइफमुळे नेहमीच चर्चेत असायचा.

‘बिग बॉस १३’ मध्ये सिद्धार्थ आणि शेहनाज यांच्यात असलेली बॉन्डिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. कधी कधी त्यांच्यात वाद देखील झाले. मात्र, त्यानंतर या सगळ्या गोष्टी विसरून ते पुन्हा एकत्र यायचे. त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘सिदनाज’ हे नाव दिलं होतं. काही महिन्यांपासून अशी चर्चा होती की तो त्याची जवळची मैत्रीण शहनाज गिल सोबत लग्न करणार होता. मात्र, हे सगळं खोट असल्याचं सिद्धार्थने तेव्हा सांगितले होते. सिद्धार्थ आणि शेहनाजची भेट ही बिग बॉस १३ मध्ये झाली होती. शेहनाजला सिद्धार्थ प्रचंड आवडायचा मात्र, त्याने तू माझी मैत्रिण आहेस असे नेहमीच तिला सांगितले.

आणखी वाचा : वयाच्या ४०व्या वर्षी निधन झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे तरी कोण?

आणखी वाचा : तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी झापलं, म्हणाले…

त्या दोघांमधील केमिस्ट्री पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ‘सिदनाज’ हे हॅशटॅग सुरु झालं होत. बिग बॉस १३ संपलं असलं तरी त्यांच्या चाहत्यांना त्या दोघांना एकत्र पाहायचं होतं. त्यामुळे त्यांनी ते हॅशटॅग सुरु ठेवलं होतं. सिदनाज हे हॅशटॅग त्यानंतर ही नेहमीच ट्रेंड होताना आपण पाहिलं. ते दोघे बिग बॉसमध्ये असताना चाहत्यांनी त्यांना सपोर्ट केला. सिद्धार्थ आणि शेहनाज रिलेशनशिपमध्ये आले पाहिजे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, ते दोघे मित्र असल्याचे नेहमी सांगायचे. सिद्धार्थ आणि शेहनाज नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना दिसले. या दोघांना ‘भुला दुंगा’ आणि ‘शोना शोना’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं.