आपल्या जादुई सुरांनी गाण्याचे सोने करणारे गायक हरिहरन यांचं प्रत्येक गाणं हे रसिकांसाठी पर्वणीच असते. या अनोळखी वाटेवर या आगामी मराठी चित्रपटातील हरिहरन यांच्या मखमली आवाजातील एक खास गझल लवकरच रसिकांना ऐकायला मिळणार आहे. के. प्रफुल्ल यांनी शब्दबद्ध केलेली ही गझल श्याम सागर यांच्या संगीताने सजली आहे.
म्युझिक मिडिया सिनेव्हिजन प्रस्तुत ‘या अनोळखी वाटेवर’ चित्रपटातील ही गझल नुकतीच ध्वनीमुद्रीत करत चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘एक पहेली जिंदगी की तस्वीरो मे खो गयी’ असे बोल असलेली ही गझल वेदनेची अनुभूती देणारी आहे. आजच्या काळात अशाप्रकारची गझल करणं हे कौतुकास्पद असून ही गझल मला गायला मिळाली, हे माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं हरिहरन यांनी यावेळी सांगितलं.
हरिहरन यांची ही गझल नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास गीतकार के प्रफुल्ल, संगीतकार श्याम सागर यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझायनरची जबाबदारी मदन माने सांभाळणार आहेत. हरिहरन यांची गझल व या अनोळखी वाटेवर हा सिनेमा प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा अनुभव असणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2016 रोजी प्रकाशित
‘एक पहेली जिंदगी की..’ हरिहरन यांची मराठी चित्रपटात गझल
‘एक पहेली जिंदगी की तस्वीरो मे खो गयी’ असे बोल असलेली ही गझल वेदनेची अनुभूती देणारी.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 30-04-2016 at 12:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer hariharan sung gazal for marathi movie