आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावणारा अभिनेता राजकुमार राववर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाची निवड ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, हंसल मेहता, आयुषमान खुराना अशा अनेक सेलिब्रिटींनी ‘न्यूटन’ला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं, ”न्यूटन’ हा चित्रपट पाहिला. अनेक पैलूवर प्रकाश पाडणारा हा चित्रपट आहे.’

Exclusive Newton Movie Director Interview : ‘माझा आनंद द्विगुणीत झाला’

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘भारताकडून ऑस्करसाठी ‘न्यूटन’ला प्रवेशिका मिळाली. कित्येक वर्षांनंतर फिल्म फेडरेशननं चांगला निर्णय घेतला.’

अनिल कपूर आणि शाहरुख खाननेही ट्विटरच्या माध्यमातून राजकुमार आणि ‘न्यूटन’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून बिग बजेट आणि सुपरस्टारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत नसताना ‘न्यूटन’ने बॉलिवूडसाठी एक चांगली बातमी दिली आहे. अमित मसूरकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची कहाणी दर्शविण्यात आली असून, राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media flooded with the wishes for newton movie getting entry to the oscars