ग्रेटर नोएडा येथे सोमवारी झालेल्या एका भीषण अपघातात एका सोशल मीडिया सेलिब्रिटीचा मृत्यू झाला आहे. वेगाने जाणारी कार झाडावर आदळून हा अपघात झाला. राऊडी भाटी असं या सेलिब्रिटीचं नाव आहे. त्याचं खरं नाव रोहित भाटी होतं. अपघातानंतर रोहितला रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्या एका मित्रावर ग्रेटर नोएडात, तर दुसऱ्यावर दिल्लीमध्ये उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या मारुती स्विफ्टचा झाडावर आदळून अपघात झाला. रोहित आणि त्याचे मित्र एका पार्टीतून परतत असताना चुहाडपूर अंडरपासजवळ पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रोहित हा मूळचा बुलंदशहरचा होता आणि तो ग्रेटर नोएडाच्या सी सेक्टरमध्ये राहत होते. तो गुजर समुदायाचा होता. तो फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय होता. तो व्हिडीओ पोस्ट करायचा. त्याचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स होते. त्याच्या निधनानंतर त्याचे फॉलोअर्स जुने व्हिडीओ शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media influencer rohit bhati died in car accident in greater noida hrc