‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला गुरूवारी पाच वर्षे पूर्ण झाली. सोनाक्षीने २०१० मध्ये सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सोनाक्षी अनेक चित्रपटांमध्ये झळकली असून सध्या आता ती बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिरावली आहे. सोनाक्षीने तिच्या बॉलीवूडमधील पाच वर्षांच्या प्रवासाबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. १० सप्टेंबरला ‘दबंग’ चित्रपटाला आणि माझ्या बॉलीवूमधील प्रवासाला पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. मी आज जे काही आहे ते केवळ तुमच्यामुळे शक्य झाले. या संपूर्ण प्रवासादरम्यान, साथ दिल्याबद्दल तुमचे आभार. या सगळ्याचे श्रेय मी सलमान खान आणि अरबाज खान यांना देते. त्यांनी मला बॉलीवूडमध्ये येण्याची संधी दिली आणि मार्गदर्शन केले, असे सोनाक्षीने ट्विटमध्ये म्हटले आहे.
२८ वर्षांची सोनाक्षी सिन्हा ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असून तिने वेशभूषाकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये सोनाक्षीने बॉलीवूडच्या १३ चित्रपटांमध्ये काम केले असून त्यापैकी ‘दबंग’, ‘दबंग-२’, ‘लुटेरा’, ‘वन्स अपॉन टाईम मुंबई- दोबारा’ हे चित्रपट विशेष गाजले. दरम्यान, सोनाक्षीच्या बॉलीवूडमधील या प्रवासाबद्दल ‘दबंग’मधील तिचा सहकलाकार सोनू सुदने ट्विटरवून आनंद व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha completes five years in bollywood so does dabangg thanks salman khan