आपल्या प्रत्येक चित्रपटात बॉलीवूड दिवा सोनम कपूर एका नव्या रुपात दिसते. आगामी ‘डॉली की डोली’ या चित्रपटातदेखील ती असचं काहीशा नव्या अंदाजात आणि रुपात दिसणार आहे. गुरुवारी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मात्र, त्यात सोनमची झलक अजिबात दिसली नाही. आज या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून जॅकेट, पायात शूज, डोळ्यावर गॉगल, हातात लाल चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र अशा काहीशा हटके अंदाजात सोनम दिसते.
बॉलीवूडमध्ये ‘डॉली की डोली’ चित्रपटाने पदार्पण करणा-या अभिषेक डोग्राने याचे दिग्दर्शन केले असून ‘फुकरे’ चित्रपटातील अभिनेता पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव यांच्याही यात भूमिका आहेत. या चित्रपटात सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘डॉली की डोली’मधला सोनम कपूरचा हटके लूक
आपल्या प्रत्येक चित्रपटात बॉलीवूड दिवा सोनम कपूर एका नव्या रुपात दिसते.

First published on: 28-11-2014 at 03:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor turns punk bride for dolly ki doli