बॉलीवूडकडे पैसा आहे. गेल्या काही वर्षांत हॉलीवूडच्या मोठय़ा स्टुडिओजनी हिंदी चित्रपटांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. आपल्याकडे खूप चांगले कलाकार आहेत आणि नव्या विचारांचे दिग्दर्शकही आहेत. तरीही हॉलीवूडच्या तुलनेत आपले चित्रपट फारच मागे आहेत, हे चित्र दिसते. गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय चित्रपटनिर्मितीचा अनुभव गाठीशी असणाऱ्या निर्मात्या भावना तलवार यांच्या मते ‘पटकथे’चा अभाव हेच बॉलीवूडच्या अपयशाचे कारण आहे.
चित्रपटनिर्मितीची गणितं सर्रास बदलत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीत आता आलेली नव्या दिग्दर्शकांची
हॉलीवूडचे तंत्रज्ञान आपल्यापेक्षा फार प्रगत
आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट करताना आणि हिंदीत काम करताना एकच गोष्ट प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे पटकथेपासून ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत तिथे तपशीलवार काम के लं जातं. बाकी सिनेमानिर्मितीची प्रक्रिया ही दोन्हीकडे सारखीच असते, असं त्यांनी सांगितलं. ‘फास्ट अँड फ्युरिअस’सारख्या चित्रपटात काम के लेल्या बॉलीवूड अभिनेता अली फजल याच्या मते हॉलीवूडचे चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञान हे आपल्यापेक्षा फार प्रगत आहे. कुठल्याही जॉनरचा चित्रपट असेल त्यासाठी हॉलीवूडमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आपल्याकडच्या चित्रपटांपेक्षा वेगळे असल्याचे त्याने सांगितले. मात्र, हॉलीवूडपटांच्या कथा या आपल्याकडच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या असतात, हेही तो मान्य करतो. पण, आत्ता हिंदी चित्रपटसृष्टीत असलेले दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमाची मांडणी करत आहेत. वेगळ्या कथा मांडण्याचा, वेगळे जॉनर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि प्रेक्षकांचाही त्यांना प्रतिसाद मिळतो आहे, असं मत अलीने व्यक्त केलं.